मनसुख हिरेनच्या हत्येत आणखी दोन अधिकाऱ्यांचा हात? ‘एनआयए’ चौकशीला बोलावणार

mansukh hiren - NIA - Maharastra Today
mansukh hiren - NIA - Maharastra Today

मुंबई : मनसुख हिरेन हत्याप्रकरणात एक मोठी धक्कादायक माहिती एनआयएच्या हाती लागली आहे. मनसुख याची हत्या करण्यात सचिन वाझेबरोबर आणखी दोन पोलीस निरीक्षकाचा सहभाग असल्याचा संशय एनआयएने व्यक्त केला आहे. वाझेच्या कटात सहभागी होऊन त्यांनी त्याला पुरावे नष्ट करण्यात मदत केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हे अधिकारी क्राइम ब्रँचमधील असून, यापैकी एकाने वाझे मनसुखसमवेत प्रवास करीत असताना त्याच्या गाडीला गायमुख ते ठाणे खाडीपर्यंत संरक्षण दिल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आहे. या दोन अधिकाऱ्यांपैकी एकजण ठाण्यातील असून, लवकरच त्यांना चौकशीसाठी बाेलाविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वाझे व मनसुख ज्या गाडीत बसले. त्यामध्ये मनसुखची हत्या करण्यात आली, त्या गाडीला रस्त्यात नाकाबंदीमध्ये कोणी अडवू नये म्हणून पोलीस निरीक्षक त्याच्या पुढे गाडीतून प्रवास करीत होता. मनसुख यांना बेशुद्ध करण्यात आलं होतं. ठाण्यातील गायमुख चौपाटी येथे पण बेशुद्ध करण्यात आलं होतं आणि एका गाडीत टाकून मनसुख यांना गायमुख चौपाटी ते मुंब्रा रेतीबंदर असं एका गाडीत नेण्यात आलं तर ही गाडी सचिन वाझे यांची होती आणि आश्चर्य म्हणजे दोन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी या वेळेस गाडीला संरक्षण दिलं होतं आणि या दोन पोलीस निरीक्षक यांनी त्यांच्या संरक्षणात बेशुद्धावस्थेत असलेल्या मनसुख यांना मुंब्रा रेतीबंदर खाडीपर्यंत पोचवले.

या दोन पोलीस निरीक्षकांनी सचिन वाझेंच्या गाडीला संरक्षण दिले कारण जर गायमुख चौपाटी ते मुंब्रा रेतीबंदर यादरम्यान जर पोलीस बंदोबस्त अथवा नाकाबंदी असती आणि या दरम्यान बेशुद्धावस्थेतील मनसुख ज्या गाडीत आहे. त्या गाडीला पोलिसांनी अडवले असते तर ती गाडी चेक न होता पुढे सोडली जावे, याकरता या दोन पोलीस निरीक्षकांनी गाडीला संरक्षण दिले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button