एनडीआरएफची आणखी दोन पथके गुरुवारी कोल्हापुरात येणार

NDRF

मुंबई : महाराष्ट्रामध्ये दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे संभाव्य पूरस्थिती बाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याच्या आपत्ती विभागाच्या प्रधान सचिवांशी चर्चा केली व आवश्यक तेथे सर्व प्रकारची मदत करण्याचे आदेश दिले. या चर्चे दरम्यान पालकमंत्री सतेज पाटील आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाचे प्रधान सचिव किशोरराजे निंबाळकर यांना कोल्हापूर जिल्ह्यामधील संभाव्य पुरपरिस्थिती बद्दल विस्तृत माहिती दिली. नामदार सतेज पाटील यांच्याशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईतून फोनवरून संपर्क साधला. कोल्हापूर शहरातील पूरस्थिती बाबत संपूर्ण आढावा सतीश पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला

कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणखी जादा एनडीआरएफ ची पथके पाठवली जावीत अशी मागणी केली. धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे राधानगरी, वारणा, व कोयना धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे, या तिन्ही धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवला तर या धरणाखाली येणाऱ्या सर्व नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होणार आहे, सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगे सह जवळपास सर्व नद्या खालील बंधारे पाण्याखाली गेले असून नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडत आहेत त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरस्थितीचा धोका संभवतो असे सतेज पाटील यांनी सांगितले.

खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात करिता आणखी जादा एन डी आर एफ ची पथके मिळावीत अशी मागणी केली, बैठकीनंतर मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे ठाकरे यांच्या निर्देशानुसार कोल्हापूर जिल्ह्यासाठी एनडीआरएफ ची दोन पथके तातडी ने कोल्हापूर कडे रवाना करण्यासाठी चे आदेशआपत्ती व्यवस्थापनाचे प्रधान सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय येवलकर यांना दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER