आणखी दोन दिवस ढगाळ वातावरण आणि पाऊस : हवामान बदलाचा परिणाम

Cloudy weather

पुणे : ऐन हिवाळ्यात राज्यात अनेक भागांत गेल्या चोवीस तासात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काल रात्रीही अनेक ठिकाणी काही काळ जोरदार पाऊस बरसला. पावसामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. येत्या दोन दिवसांत राज्यातील अनेक भागांत पाऊस होईल, अशी शक्यता आहे. हवामान बदलामुळे पाऊस पडत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

काल, सोमवारी सकाळपासून आकाश ढगाळले होते. प्रारंभी धुके आणि त्यानंतर ढगाळ वातावरणाने दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. तापमानातही लक्षणीय वाढ झाली. सरासरी पारा चार अंशांनी वाढला. यामुळे थंडी गायब झाली. आज मंगळवार आणि उद्या बुधवारीही पाऊस होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वादळी वारे, मेघगर्जनेसह तसेच काही भागांत विजेच्या कडकडाटासह पाऊस होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. रब्बीमध्ये गहू आणि हरभरा ही दोन मुख्य पिके प्रामुख्याने घेतली जातात. या पिकांना थंडीचे वातावरण पोषक असते. थंडीचा कडाका वाढला की ही पिके बहरतात. परंतु, थंडी कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम या पिकांच्या उत्पादनावर होणार आहे. भाजीपाला व उसावर या वातावरणाचा फारसा फरक पडणार नाही. परंतु, सध्याच्या बदलत्या वातावरणाचा फटका फळबागांना मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे.

ढगाळ वातावरणामुळे पावसाळ्यात ज्या प्रकारे आजार डोके वर काढतात. तसेच सर्दी, खोकला, ताप यासह साथींचे आजार उद्भवतात. कोरोना संसर्गासाठी हे वातावरण पोषक आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे. काळजी महत्त्वाची आहे. स्वच्छता, सकस व ताजा आहार घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER