
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी दोन व्यक्तीचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 19 झाली आहे. यातील एक रुग्ण पणदूर ता. कुडाळ येथील रुग्णाच्या सम्पर्कातील एक व्यक्ती कणकवली तालुक्यातील आहे. त्याचे आहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत. तर वैभववाडी तालुक्यातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आली आहे. दोन्ही रुग्णांनी मुंबई येथून प्रवास केला आहे. या दोन्ही व्यक्ती अलगीकरणात होत्या.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला