आणखी दोन बँकांचे खासगीकरण होणार

Nirmala Sitharaman

नवी दिल्ली :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प सादर करताना ‘आयडीबीआय बँके’सह (IDBI Bank) आणखी दोन बँकांचे खासगीकरण करण्याची घोषणा केली होती. सरकारच्या रडारवर आता निर्गुंतवणुकीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी कोणत्या दोन बँका आहेत, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.

या आर्थिक वर्षासाठी निर्गुंवतवणुकीच्या माध्यमातून १.७५ लाख कोटी रुपये जमा करणे, हे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. यात आयडीबीआय बँकेतून सरकार निर्गुंतवणूक करणार आहे आणि दोन बँका कोणत्या असतील, याबाबत ग्राहकांसह गुंतवणूकदारही वेगवेगळे अनुमान लावत आहेत. यावर अनेक अंदाज लावले तरी सरकारने जाहीर केल्याशिवाय संपूर्ण माहिती मिळणार नाही, असे सांगितले जात आहे.

पंजाब अँड सिंध, यूको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसिस बँक यापैकी त्या दोन बँका असू शकतात, असे सांगितले जात आहे. तर मीडिया रिपोर्टनुसार, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांची नावे चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे.

आगामी काळात सरकारी बँकांची संख्या कमी करून खासगीकरणावर भर देण्यात येणार आहे, असे सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या वर्षी १० बँकांचे विलीनीकरण करून त्याचे चार बँकांत रूपांतर करण्यात आले होते. आता आणखी काही बँकांतून सरकार निर्गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER