येदियुरप्पांच्या मंत्रिमंडळ विस्तारात बेळगाव जिल्ह्यातून दोघांना संधी

Belgaum district find berth in Karnataka Cabinet expansion

बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी आज गुरुवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. या विस्तारात सीमाभागातील बेळगाव जिल्ह्यातून दोघांना संधी देण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यातून कॅबिनेट मंत्रिपद मिळालेल्यांमध्ये रमेश जारकीहोळी आणि श्रीमंत पाटील यांचा समावेश आहे. मागील महिन्यातच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न बेळगाव जिल्ह्यात पेटला होता, हे येथे उल्लेखनीय.

आजच्या विस्तारात काँग्रेस आणि जनता दल (से) सोडून भाजपात आलेल्या १० जणांना स्थान देण्यात आले आहे. श्रीमंत पाटील हे बेळगाव जिल्ह्यातील कागवाडचे आमदार असून, रमेश जारकीहोळी हे गोकाक येथील आमदार आहेत.