मुंबई आणि पुण्यात आगीच्या दोन मोठ्या घटना, करोडोंचे नुकसान

Two major fire incidents in Mumbai and Pune

मुंबई/पुणे : आज पहाटेच्या सुमारास मुंबई आणि पुण्यामध्ये आगीच्या दोन मोठ्या घटना (Two major fire )घडल्या. दोन्ही घटनांमध्ये जिवीतहानी झालेली नसली तरीही करोडोंचे नुकसान झाले आहे.

पहिल्या घटना पुण्यात घडली. पुण्यातील कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्रातील शिवशक्ती ऑक्सीलेट या कंपनीला आग  (Fire in Shiv shakti Oxalate Pune)लागली. काल रात्री पावणे दोनच्या सुमारास अचानक या कंपनीत आग लागली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. कंपनीत आग लागल्याने मोठ्याने स्फोटाचे आवाज येत होते. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी आगीच्या घटनेचा अहवाल मागितला आहे.

आग आणि स्फोटाची तीव्रता भयानक होती. साधारण १५ ते २० किलोमीटर अंतरावरून आग आणि धुराचे लोट दिसून येत होते. कंपनी गावापासून जवळच असल्याने भयभीत झालेल्या नागरिकांनी गाव सोडून पळण्याची भूमिका घेतली होती. सुरक्षिततेच्या कारणास्तव इतर आजूबाजूच्या कंपन्यातील कामगारांना बाहेर सोडण्यात आले होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कंपनीत प्रचंड प्रमाणात रासायनिक (केमिकल) साठा होता. तो जळून खाक झाला आहे.

तर दुसरी घटना मुंबईत घडली. हार्बर मार्गावरील चेंबूर स्थानकाजवळ असलेल्या मार्केटमधील एका दुकानाला पहाटे आग लागली. आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले असून या घटनेत कोणीही जखमी न झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली. आग लागलेल्या ठिकाणापासून जवळच रेल्वे स्थानक व इतर दुकाने असल्याने अग्निशमन दलाने लेव्हल-२ च्या आगीची घोषणा करत १० अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पाठवली.तब्बल २ तास २० मिनिटानंतर या आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले. पहाटेची वेळ असल्याने दुकानात कोणी नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER