वाकेड येथे झालेल्या अपघातात कणकवलीचा दुचाकीस्वार ठार

Accident

रत्नागिरी/प्रतिनिधी : लांजा तालुक्यातील वाकेड येथे आयशर टेम्पो आणि दुचाकी यांच्यात अपघात होऊन कणकवली येथील दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी ५.५५ वाजण्याच्या सुमाराला घडली. मधुसुदन लिंगायत (४५, कासार्डे, कणकवली) आणि त्यांची पत्नी कणकवलीहून रत्नागिरीकडे जात होते. या अपघातात मधुसूदन लिंगायत हे ठार तर त्यांची पत्नी माधवी या किरकोळ जखमी झाल्या.

कलबुर्गी पोलिसांकडून ‘त्या’ वक्तव्यावरून वारिस पठाण यांना नोटीस

कासार्डे येथील मधुसुदन लिंगायत आपल्या पत्नीसह (४१) दुचाकीने (एमएच ०७/ आर ०३३७) कणकवलीहून रत्नागिरीकडे जात होते. वाकेड घाटात मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पोने (एमएच ०३/ सीपी ५५३८) दुचाकीला धडक दिली. यामध्ये मधुसुदन लिंगायत यांच्या हेल्मेटचे तुकडे होऊन त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने लांजा ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची पत्नी माधवी या रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.