मिरजेत दोन किलो गांजा जप्त ः धुम‘पान करणार्‍या वीस जणांना दंड

सांगली ः स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अंमलीपदार्थ विरुध्द मोहिम उघडली असून मिरजेत गांजाविक‘ेत्याकडून दोन किलो गांजा जप्त केला. सांगली आणि मिरजेत निर्जन ठिकाणी गांजाची नशा करणार्‍या पाच जणांवर कारवाई केली तर महाविद्यालयाच्या परिसरात सार्वजनिक ठिकाणी धुम‘पान करणार्‍या वीस जणांकडून तीन हजार रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती पोलीस निरिक्षक श्रीकांत पिंगळे यांनी पत्रकारांना दिली.

मिरजेतील रेवणी ग‘ी ते गाढवे पेट्रोलपंपाच्या दरम्यान एकजण गांजाची विक‘ी करत असल्याची माहिती मिळताच पोलीसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी वसीम मेहबुब शेख (वय 38, रेवणीग‘ी, मिरज) हा पोलीसांच्या तावडीत सापडला. त्याच्याकडे सुमारे 24 हजार रुपये किमतीचा दोन किलो तीस ग‘ॅम तयार गांजा सापडला.

गांजाविरुध्द कारवाई करणार्‍या दुसर्‍या पथकाला सांगलीतील विश्रामबाग परिसरातील हनुमाननगरमधील एका शाळेनजिक गांजाची नशा करत असलेला सुनिल प्रकाश कांबळे (वय 23 रा. हनुमाननगर) हा सापडला. मिरजेतील खॉजा वस्ती परिसरात योगेश श्रीमंत कांबळे, प्रथमेश बाबासो सुर्वे ( दोघेही रा. माणिकनगर), मोजेश रामचंद्र भंडारे ( वानलेसवाडी), जेफरी मरीदास अॅन्थोनी असे चौघेजण गांजाची नशा करत असताना सापडले.