ठाण्यात एका व्यक्तीसाठी दोन तर नागपुरात दोन व्यक्तींमागे एक इंजेक्शन; बावनकुळेंचा आरोप

CHandrashekhar Bawankule

नागपूर :- सध्या नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावरून भाजप नेते माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी रेमडेसिवीर, ऑक्सिजन वाटपात विदर्भावर अन्याय होत असल्याचा आरोप केला. महाराष्ट्राच्या सरकारमधील हेवीवेट मंत्री सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणून त्यांच्या जिल्ह्यासाठी दुप्पट ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा स्टॉक करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

मराठवाड्यातील एका मंत्र्यानं १० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा स्टॉक केला. पश्चिम महाराष्ट्रातील मंत्र्यानं २५ हजार इंजेक्शन नेले. ठाण्यात एका रुग्णामागं दोन इंजेक्शन आणि नागपूरमध्ये (Nagpur) दोन रुग्णांमागं एक इंजेक्शन मिळत आहे.राज्यातील वजनदार मंत्री आपल्या जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात इंजेक्शन घेऊन जात आहेत, असा आरोपदेखील त्यांनी केला. नागपूरमधील मंत्री जिल्ह्याला रेमडेसिवीर मिळवून देण्यात कमी पडत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाणे जिल्ह्यात रुग्णामागे रेमडेसिवीरची दोन इंजेक्शन मिळत आहे तर नागपुरात मात्र दोन रुग्णांमागे एक एवढा साठा दिला जात आहे. ठाणे आणि नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राचा संदर्भ देत त्यांनी हा आरोप केला आहे. ऑक्सिजन संदर्भातसुद्धा तीच परिस्थिती आहे. नागपुरातील मंत्री आपल्या जिल्ह्याला रेमडेसिवीर मिळवून देण्यासाठी कमी पडत आहेत. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. पालकमंत्री नितीन राऊत यांना याविषयी पत्र लिहिल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.

अनेक जिल्ह्यांतील मोठे नेते आपलं वजन वापरून आपल्या जिल्ह्याला इंजेक्शन मिळवून घेत आहेत. गोंदियामध्ये ऑक्सिजन नसल्यामुळे रुग्णांचा जीव गेला, याकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. विदर्भात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना विदर्भातील नेते आपलं वजन का वापरात नाहीत? असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. विदर्भातील नेत्यांनी आपलं वजन वापरून हा अन्याय दूर करावा, असं आवाहन बावनकुळे यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button