साताऱ्यात गांजा शेती करणारे दोन विदेशी तरुण ताब्यात

साताऱ्यात गांजा शेती करणारे दोन विदेशी तरुण ताब्यात

सातारा : सातारा (Satara) जिल्हयातील वाई शहरालगत असणाऱ्या उच्चभ्रू नंदनवन पार्कमधील विष्णू श्री स्मृती रो हाऊसमध्ये जर्मनीचे दोन विद्यार्थी गांजाची शेती करताना आढळले. सातारा पोलिसांनी त्यावर धाड टाकली. दोन विदेशी तरुणांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांचा घटनास्थळी असून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी कारवाई वेळी संपूर्ण परिसर सील केला आहे. जप्त केलेला मुद्देमाल तपासण्यासाठी फोरेन्सिक लॅब मधील तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, या मागे अमली पदार्थांची तस्करी करणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER