रत्नागिरीत अंगावर कडाप्पे पडून दोन कामगारांचा मृत्यू; चार जखमी

रत्नागिरी/प्रतिनिधी: रत्नागिरी शहरातील उद्यमनगर भागात कामगारांच्या अंगावर 50 ते 60 मोठ्या लाद्या पडून दोघांचा मृत्यू झाला आहे तर चारजण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी रात्री उशीरा घडली.

रत्नागिरी शहरातील उद्यमनगर भागात महिला रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी रात्रीच्या काळोखात लाद्या उतरवून घेण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना काम करत असलेल्या सहा कामगारांच्या अंगावर 50 ते 60 मोठ्या लाद्या पडून ते गंभीर जखमी झाले. ठेकेदाराने कोणालाही न कळवता या बेशुद्ध कामगारांना ऍम्ब्युलन्समधून शासकीय रुग्णालयात दाखल केले.

तेथे दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. ठेकेदार व साईट सुपरवायझर च्या हलगर्जीपणामुळे ही गंभीर घटना घडल्याचे समजते.