राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरण

पुणे :- राज्यभर गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण आहे. या वातावरणामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांत  हलक्या स्वरूपाचा पाऊस हजेरी लावत आहे. अजून दोन दिवस अशीच स्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे किमान व कमाल तापमानात चार ते पाच अंशांपर्यंत वाढ राहण्याची शक्यता आहे.

दिवाळीनंतर थंडीचा जोर वाढत असतो. मात्र, ढगाळ वातावरणामुळे नोव्हेंबरमधील थंडी गायब झाली असून, आता थंडीसाठी डिसेंबर महिन्याची वाट पाहावी लागणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दक्षिण भारतात ईशान्य मान्सून सक्रिय झाला आहे, तर उत्तर भारताकडून राज्याकडे वाहात असलेल्या वाऱ्यांमुळे आर्द्रता निर्माण होत आहे.

त्यामुळे राज्यातील किमान आणि कमाल तापमानात सरासरीपेक्षा चार ते पाच अंश सेल्सिअसने वाढ झालेली दिसून येत आहे. सध्या दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या पट्ट्याचे रूपांतर आता तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होऊन तो आता ओमानकडे सरकणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला या भागांत ढगाळ वातावरण राहील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER