दोन दिवसांपूर्वी गोव्यात ऑक्सिजन अभावी २६ रुग्णांचा, तर आज १५ जणांचा मृत्यू

Goa Hospital

पणजी :- गोव्यातील रुग्णालयात ऑक्सिजन (Oxygen) प्रेशर कमी झाल्यामुळे १५ कोरोना (Corona) रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोन दिवसापूर्वीच ऑक्सिजनअभावी २६ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज १५ रुग्णांनी ऑक्सिजनअभावी जीव गमावल्याची दुर्दैवी घटना घडली. गोवा सरकारी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. मृतांच्या नातेवाईकांच्या दाव्यानुसार, जोपर्यंत गोवा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात जोपर्यंत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाला, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. वृत्तसंस्था एएनआईच्या मते, ऑक्सिजन पुरवठ्याअभावी रात्री दोन ते पहाटे सहापर्यंत रुग्णांचा मृत्यू झाला.

एका रुग्णाच्या मित्राने केलेला दावा अतिशय गंभीर आहे. त्याच्या दाव्यानुसार, या रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दररोज २०-२५ जणांचा मृत्यू होतो. या दाव्यात कितपत तथ्य आहे, हा संशोधनाचा मुद्दा आहे. दरम्यान, सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, सध्या जे मृत्यू झाले त्याचं नेमकं कारण शोधलं जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button