दोन कोटी वाहनांना बसवावी लागणार फास्टटॅग यंत्रणा

नवी दिल्ली : देशातील सुमारे दोन कोटी वाहनांनी अजूनही फास्टॅगपासून (fast tag system) लावलेला नाही. तर दुसऱ्या बाजूला देशातील अनेक टोल नाक्यावर फास्टगसाठी आवश्यक असलेली यंत्रणा पूर्ण क्षमतेने अजूनही कार्यान्वित झालेली नाही. केंद्र शासनाने १ जानेवारी २०२० पासून संपूर्ण देशात असलेल्या चारचाकी फास्टंगच्या माध्यमातून टोल वसुली करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र शासनाने सोमवारी मध्यरात्रीपासून या धोरणाची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात मालवाहू वाहनांची संख्या सुमारे सहा कोटी ५० लाखांच्या आसपास आहे. यापैकी पाच ते साडेपाच कोटी वाहनांचा सातत्याने या ना त्या निमित्ताने राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांशी संबंध येतो.

मात्र एवढ्या प्रचंड संख्येने टोल नाक्यांवरून वाहतूक करणाऱ्या या वाहनांपैकी गेल्या वर्षभरात ७५ टक्के म्हणजे केवळ ४ कोटी ६० लाख वाहनांनीच आजपर्यंत फास्टंग यंत्रणा बसवून घेतली आहे. उर्वरित सुमारे २ कोटी वाहने अजूनही फास्टंगपासून अलिप्त असल्याचे टोल नाक्यांवरील उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. देशभरात राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर मिळून एकूण ५४० टोल नाके असून या मार्गावरून दिवसाकाठी पाच ते सहा कोटी वाहने प्रवास करतात बनावट नोटा, बनावट स्टेप्प पेपर, बनावट शासकीय दस्तावेज याचा अनुभव नवीन नाही. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी बनावट फास्टंग बनवून वाहनधारकांना आणि बँकांना २० कोटी रुपयांचा गंडा घालणारी टोळी ताब्यात घेतली आहे. अशाच पद्धतीने एखाद्या फास्टंगचे क्लोनिंग झाले किंवा तसाच बनावट फास्टॅंग बनविला गेला तर त्याची पड़ताळणी करण्याची कोणतीही स्वतंत्र व्यवस्था सध्याच्या टोल वसुली यंत्रणेकडे नाही. त्यामुळे फास्टंग क्लोनिंग तंत्राचा सुळसुळाट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER