एसीपीचा अमेरिकन कुत्रा चोरासह पकडला गेला

two-booked-for-stealing-acps-pet-one-arrested

पुणे : पुणे शहर पोलीस (Pune Police) दलाचे सहायक पोलीस आयुक्त तथा ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनी परदेशी कुत्रा पाळला आहे. अमेरिकन बुलडॉग जातीचा पाळलेला परदेशी कुत्रा चोरीला गेल्याचे समजताच विजय चौधरी यांनी लष्कर पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दाखल केली.

बड्या अधिका-याची कुत्रा हरवल्याची तक्रार दाखल होताच पोलीस यंत्रणा तत्परतेने कामाला लागली व कुत्र्यासह चोराला ताब्यात घेण्यात आले. चोरीला गेलेला कुत्रा बंगल्यातून बाहेर निघून गेला होता. विदेशी कुत्रा रस्त्यावर मोकाट फिरत असल्याचे बघून चोरट्यांनी त्याला पळवून नेले. तक्रार दाखल झाल्यानंतर सीसीटीव्ही तपासले असता कैलास चव्हाण व त्याच्या साथीदाराने कुत्र्याला पळवून नेल्याचे समोर आले. हडपसर परिसरातून कैलास व त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांच्या कुत्र्याची चोरी होताच पोलीस दल ज्या तत्परतेने कामाला लागते आणि चोराला पकडते तीच तत्परता इतर गुन्ह्यांमध्ये दाखवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER