दोन बडे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

bribe case

अकोला :  कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चिती व फरकाच्या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी घेतलेल्या लाचप्रकरणी दोघे अधिकारी आज अडकले. अकोला एसीबीने हा सापळा रचला होता. विक्रीकर विभागाचे सहायक आयुक्त अमर शेट्टी यांच्यामार्फत जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी दोन लाख रुपयांची तक्रारदाराकडून लाच स्वीकारली.

तक्रारदाराने १० जून रोजी एसीबीकडे तक्रार दिली होती. तक्रारीनुसार त्यांचे स्वत:चे व त्यांच्या अधीनस्थ असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चिती आणि फरकाच्या प्रस्तावास मान्यता देण्याचे काम होते. त्यासाठी सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी विक्रीकर विभागाचे सहायक आयुक्त अमर शेट्टी यांच्यामार्फत रकमेची प्रथम मागणी केली होती.

त्यानंतर तक्रारदारास पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक एस.एस. मेमाणे यांनी पडताळणी केली. डॉ. प्रवीण लोखंडे यांनी अमर शेट्टी यांच्यामार्फत तक्रारदाराला लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.

या रकमेपैकी अर्धी रक्कम देण्याबाबत सहमती झाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ९ जुलै रोजी सापळा रचला. सापळा रचला असताना अमर शेट्टी यांनी तक्रारदाराकडून दोन लाख रुपयांची लाच स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहात अटक केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER