व्हॉट्सऍप वर वैयक्तिक बदनामी करणाऱ्या कोल्हापुरातील दोघांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर :- आमदार सतेज पाटील आणि काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांची व्हाट्सअप च्या माध्यमातून बदनामी करणारे अमर औंधकर आणि एक निनावी फोन नंबर विरोधात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवडणुकीच्या प्रचारासाठी व्‍यक्‍तीगत ग्रुपसह राजकीय व्‍हॉट्‌सॲप ग्रुपची जोरदार चलती सुरु आहे. एकाच ग्रुप समुहावर अनेक पक्षाचे उमेदवार, कार्यकर्ते असल्‍याने एखादी राजकीय पोस्‍ट पडल्‍यानंतर ‘त्‍याला सकारात्‍मक व नकारात्‍मक असा दोन्‍ही प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे.’ सकारात्‍मक ऐवजी नकारात्‍मक रंग वेगाने भरले जात असल्‍याने आक्षेपार्ह मेसेजमुळे समाजस्वास्थ बिघडू शकते. यातूनच व्‍हॉट्‌सॲपवर झालेल्‍या राजकीय व समाजात तेढ निर्माण करु पाहणार्‍या पोस्‍टप्रकरणी पोलिस ठाण्यांपर्यंत तक्रारी जाण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. महाराष्ट्रात ठिकठिकाणी अशा घटना वाढू लागल्‍याने पोलीसही अलर्ट झाले आहेत. अशा घटनांबाबत पोलिसांना माहिती मिळाल्‍यानंतर ते कायदेशीर कारवाई केली जात आहे. फुकटच्या प्रचाराच्या नादात नेटकऱ्यांना पोलिस ठाण्याची वारी करावी लागण्याची शक्यता आहे.

सीआरपीसी १४९, एनसी व दखलपात्र गुन्ह्याची नोंद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्‍हॉट्‌सॲप समाजस्वास्थ बिघडू शकते. असे व्हॉट्‌सॲप ग्रुप पोलिसांच्या रडारवर आहेत. वादग्रस्त पोस्ट पडणाऱ्या ग्रुपची माहिती घेवून पोलिस त्‍यावरील ॲडमिनला सीआरपीसी १४९ ची नोटीस देवू शकतात. या नोटीसीद्वारे समज दिली जाते की ग्रुपवरुन कायदा सुव्‍यवस्‍थेचा प्रश्न ऐरणीवर येवू शकतो. त्‍यामुळे संबंधित बाबी टाळल्‍या जाव्‍यात. यातूनही एखादा तक्रारदार व्‍हॉट्‌सॲप ग्रुपवर भावना दुखावल्‍याची तक्रार घेवून आल्‍यास पोलिस त्‍यानुसार दोन प्रकारचे गुन्‍हे दाखल करणार आहेत. ग्रुपवरील वर्डींग (शब्द) वाचून अदखलपात्र (एनसी) किंवा दखलपात्र गुन्‍ह्याची नोंद होवू शकते. दखलपात्र गुन्‍ह्यामध्ये दंगलीसारख्या गंभीर कलमांचा समावेश आहे.