कांग्रेस नेता मनीष तिवारी आणि राजीव सातव यांच्यात ‘ट्विटरवॉर’

Manish Tiwari-Rajiv Satav

मुंबई : कांग्रेस (Congress) अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी काही दिवसांपूर्वी राज्यसभा खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत खासदार राजीव सातव यांनी यूपीए 2 सरकारमध्ये मंत्री असलेल्या अनेक वरिष्ठ नेत्यांना पक्षाच्या सध्याच्या वाईट स्थितीसाठी जवाबदार धरले . या बैठकीच्या दोन दिवसानंतर UPA सरकारमध्ये मंत्री असलेले मनीष तिवारी (Manish Tiwari) ने ट्वीट करत राजीव यांच्याही वक्तव्याचा समाचार घेतला आहे . यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये ‘ट्विटरवॉर’ रंगलेले पाहायला मिळाले .

दुर्दैवाने कॉंग्रेसमधील काही आजारी लोकांनी डॉ. मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्याशी भांडणे सुरू केली यूपीएने भाजपशी झुंज देण्याऐवजी पूर्वच्या यूपीए सरकारबरोबर लढा सुरू केला आहे. आता जेव्हा एकत्र येण्याची वेळ आली आहे, तेव्हा आपण विभाजनाचा विचार करीत आहोत,असा शब्दात तिवारी यांनी सातव यांना ट्विटरच्या माध्यमातून खडेबोल सुनावले .

तिवारी यांच्या ट्विटवर सातव यांनी प्रतिउत्तर दिले आहे . राजीव ने आपल्या ट्वीट एक कविता पोस्ट केली आहे , मत पूछ मेरे सब्र की इन्तेहा कहां तक हैतु सितम कर ले, तेरी ताक़त जहां तक है,व़फा की उम्मीद जिन्हें होगी, उन्हें होगीहमें तो देखना है, तू ज़ालिम कहां तक है, असे ट्विट सातव यांनी केले . त्याच्या या ट्विटनंतर राजकीय क्षेत्रात उलट -सुलट चर्चा रंगल्या आहेत .

दरम्यान सोनिया गांधींनी खासदारांसमवेत झालेल्या बैठकीत राजीव सातव यांनी यूपीए -२ सरकारमधील मंत्री असलेल्या नेत्यांविरूद्ध उघडपणे मोर्चा उघडला. राजीवच्या या भूमिकेवर अनेक वरिष्ठ नेते नेतेही संतप्त आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER