अनिल कपूर आणि अनुराग कश्यपमध्ये ट्विटर वॉर

Anurag Kashyap - Anil Kapoor

सोशल मीडिया (Social Media) खरोखरच वाईट आहे यात शंका नाही. दोन मित्रांमध्ये गमतीत सुरु झालेले संभाषण कधी एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढण्याकडे वळते ते कळत नाही. ट्विटरवर अनेक कलाकारांमध्ये ट्विटर वॉर झाल्याची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. शेतकरी आंदोलनावरून नुकतेच कंगना आणि दलजीत दोसांजमध्ये झालेले ट्विटर वॉर झाले होते आणि ते खूप ट्रेंडिगही झाले होते. ट्विटरवर वॉर करणाऱ्या या यादीत आता अनिल कपूर (Anil Kapoor) आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांचीही भर पडली आहे. विशेष म्हणजे या दोघांचे संभाषण गमती गमतीत सुरु झाले आणि नंतर या संभाषणाने गंभीर वळण घेतले. हे संभाषण इतके गंभीर झाले की अनुराग कश्यपने चक्क अनिल कपूरच्या अभिनयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि अनिल कपूरनेही त्याला तसेच उत्तर दिले.

अनिल कपूर आणि अनुरागमध्ये हे ट्विटर वॉर सुरु झाले अनिल कपूरच्या एका ट्विटमुळे. अनिल कपूरने, नेटफ्लिक्सवरील सर्वोत्कृष्ट वेब सीरीज ‘दिल्ली क्राइम’ची प्रशंसा केली. ट्विटमध्ये अनिल कपूरने म्हटले होते, ‘मी अगोदरही म्हटले होते आणि आताही म्हणतो की, ते पुरस्कार डिझर्व्ह करतात. दिल्ली क्राइमच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. आपल्या लोकांना जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळते तेव्हा ते पाहून खूप बरे वाटते. अनिल कपूरच्या या ट्वीटवर अनुरागने प्रतिक्रिया देताना, ‘डिझर्व्हिंग लोकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळताना पाहून चांगले वाटते. . मात्र तुमचे ऑस्कर कुठे आहे? नाही? चांगले नॉमिनेशन.’ असे लिहिले.

अनिल कपूरने यावर उत्तर देताना लिहिले, ‘तुम्ही ऑस्करच्या जवळ तेव्हा आला जेव्हा तुम्ही टीव्हीवर ‘स्लमडॉग मिलेनियर’ ला ऑस्कर जिंकताना पाहिले होते.’ अनिल कपूरच्या या ट्विटला उत्तर देताना अनुरागने लिहिले, ‘असे म्हटले जाते की के-के-किंग ने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. तुम्ही या चित्रपटासाठी सेकंड च्वॉईस होता ना? अनुरागच्या या ट्वीटचा अनिल कपूरला खूप राग आला आणि त्याने लिहिले, ‘कोणी काम करण्यास नकार दिला आणि मी ते केले याने काहीही फरक पडत नाही. काम काम असते. काम शोधण्यासाठी तुझ्याप्रमाणे मला केस खेचत बसावे लागत नाही.

यावर अनुराग ने लिहिले, ‘सर तुम्ही तर केसांची गोष्टच करू नका. तुम्हाला तर तुमच्या केसांमुळेच रोल मिळाले आहेत. यावर रागावून अनिल कपूरने लिहिले, ‘बेटा माझ्याप्रमाणे करिअर करण्यासाठी स्वतःमध्ये सीरियस स्किल्स असणे आवश्यक आहे. उगाचच गेल्या 40 वर्षांपासून माझी गाडी सुरु नाही. असा टोलाही अनिल कपूरने अनुराग कश्यपला लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER