प्रियंका गांधी, चित्रा वाघसह दिग्गजांनी फॉलो केले #SareeTwitter

#SareeTwitter

मुंबई : ट्विटरवर सध्या #SareeTwitter ची क्रेझ सुरू आहे. कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या ट्रेंडच्या मोहात पडल्या आहेत. त्यांनी बुधवारी (१७ जुलै) सकाळी त्यांच्या लग्नाच्या वेळेचा साडीतील एक फोटो ट्विट  केला आहे.

प्रियंका गांधी ट्विटमध्ये लिहितात, ‘२२ वर्षांपूर्वी माझ्या लग्नाच्या दिवशी सकाळच्या पूजेचा हा फोटो’, असे लिहून त्यांनी #SareeTwitter या हॅशटॅगचा वापर केला.

१८ फेब्रुवारी १९९७ रोजी व्यावसायिक रॉबर्ट वड्रा यांच्याशी प्रियंका गांधी यांचं लग्न झालं.

प्रियंका  या ट्विटरवर नेहमी सक्रिय राहतात. त्या अनेक मुद्यांवर आपली मतं मांडत असतात, तर कधी विरोधकांवर निशाणाही साधतात.

आतापर्यंत अनेक सिनेमा कलाकार, नेते मंडळी, महिला अधिकारी, महिला पोलीस अधिकाऱ्यांनी साडीमध्ये त्यांचे फोटो ट्विट  केले आहेत. तर पुरुषांकडून ट्विटरवर #KurtaTwitter हा ट्रेंड फॉलो केला जात आहे.

अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही या ट्रेंडला फॉलो करत पैठणी नेसलेला फोटो शेअर केला आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर साडीमधील फोटो शेअर केले.

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमनेही तिचा साडीतील एक फोटो शेअर केला आहे.

साडी ट्विटरच्या ट्रेंडनंतर मुंबई पोलिसांनी #KhakiSwag ट्रेंड सुरू केला. यामध्ये पोलीस अधिकारी त्यांच्या खाकी वर्दीतील फोटो शेअर करत आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर काही फोटो शेअर केले आहेत.