ट्विटर हिंदूफोबिक आणि अँटीनॅशनल आहे, कंगनाचा आरोप

Kangana Ranaut - Twitter

उदयपुरमध्ये भावाच्या लग्नात व्यस्त असतानाही कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर विविध विषयांवर आपली प्रतिक्रिया देताना विसरत नाही. प्रत्येक मुद्द्यावर ती प्रतिक्रिया देतेच. बॉलिवूडमधील काही कलाकार आणि शिवसेनेवर टीका केलेल्या कंगनाने आता ट्विटरवर (Twitter) निशाना साधला आहे. ट्विटर हिंदूफोबिक आणि अँटीनॅशनल असल्याचे तिने ट्विटरवरच लिहिले आहे.

कंगनाने तिच्या ट्विटर हँडलवर तीन फोटो शेअर केले आहेत. यासोबत तिने लिहिले आहे, ‘माझ्या वडिलांसोबत माझा एक दुर्मिळ फोटो, ज्यात आम्ही कुठल्या तरी गोष्टीवर सहमती दर्शवताना दिसत आहोत. कोणती गोष्ट आहे ते आता आठवत नाही. जाऊ दे. मी आता असे ऐकले आहे की, सरकार ट्विटरवर बंदी घालू शकते. भारतात असे घडण्याची आवश्यकता आहे. आम्हाला अशा हिंदूफोबिक आणि अँटीनॅशनल प्लॅटफॉर्मची गरजच नाही.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER