जगातील दिग्गज नेत्यांचे ट्विटर अकाउंट हॅक; ट्विटरच्या CEO ने व्यक्त केला खेद

Obama - Bill Gates - Jack Dorsey

मुंबई : हॅकर्सने आता थेट मोठ्या नेत्यांचे अकाउंट हॅक करण्याचे धाडस केले आहे. व्यावसायिक आणि बड्या व्यक्तींचे ट्वीटर अकाऊंट हॅक करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकन नेते Obama जो बिडेन, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स Bill Gates आणि एप्पल मधील बरीच महत्त्वाची ट्वीटर अकाऊंट आहेत. ट्विटर हँडल हॅक झाल्यावर त्यावर एक खास मेसेज पोस्ट करण्यात आला. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं ट्विटर हँडलही हॅक करण्यात आले. हे संदेश क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याच्या उद्देशाने केल्याचं समोर आलं आहे. या मेसेजला काही वेळानं ट्वीटर हँडलवरून हटवण्यातही आलं होतं.

यावर आता ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष (सीईओ) जॅक डॉर्सी यांनी खेद व्यक्त केला आहे. डॉर्सी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुनच यासंदर्भात भाष्य करताना आम्ही या समस्येवर काम करत आहोत असं म्हटलं आहे.

भारतीय वेळेनुसार गुरुवारी रात्री एकच्या सुमारास ट्विटवरील काही दिग्गज मंडळीची अकाउंट हॅक करुन त्यावरुन विचित्र ट्विट करण्यात आले. अकाउंट हॅक झालेल्या व्यक्तींच्या यादीमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, अमेरिकन नेते जो बिडेने, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांच्याबरोबरच अ‍ॅपलसारख्या जगप्रसिद्ध कंपनीच्या मालकीच्या काही खात्यांचा समावेश होता. याचसंदर्भात आता डॉर्सी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER