क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच खेळले ‘जुडवा’ ओपनर! लक्झेमबर्गच्या बार्कर बंधूंनी घडवला इतिहास

Central Europe Cup

क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय सामने खेळलेली भावंडे काही कमी नाहीत. एकाच सामन्यात सोबत खेळलेली भावंडेही बरीच आहेत; पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असलेल्या जुळ्या भावंडांची (Twins) संख्या मोजकीच आहे आणि ते सोबत एकाच सामन्यात खेळलेय असेही क्वचितच घडले आहे; पण आतापर्यंत कोणत्याही जुळ्या भावांनी डावाची सुरुवात केलेली होती. आता तो विक्रमसुद्धा नोंदला गेलाय.

लक्झेमबर्ग (Luxembourg) संघासाठी खेळणाऱ्या टिमोथी बार्कर (Timothy Barker) व जेम्स बार्कर (James Barker) या जुळ्या भावांनी हा विक्रम केला आहे. प्राग येथे सेंट्रल युरोप कप (Central Europe Cup) स्पर्धेच्या पहिल्या टी-20 सामन्यात शुक्रवारी झेक रिपब्लिकविरुद्ध ते सलामीला उतरले आणि हा इतिहास घडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात डावाची सुरुवात करणारी ती पहिली जुळी भावंडे ठरली आणि त्यांनी ८३ धावांची सलामी देत आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. टिमोथीने ४२ चेंडूंत ६० आणि जेम्सने ३१ चेंडूंत १८ धावा केल्या.

या जुळ्या भावंडांची जन्मतारिख ११ सप्टेंबर १९९५. दोघेही डावखुरे फलंदाज आणि डावाची सुरुवात करणारी पहिलीच जुळी भावंडे.

स्टिव्ह व मार्क वॉ
जुळ्या भावंडांचा क्रिकेटपुरता विषय निघाला की, सर्वांत आधी आठवतात ते ऑस्ट्रेलियाचे स्टिव्ह आणि मार्क हे वॉ बंधू. ५ एप्रिल १९९१ ला हे पहिल्यांदा एकाच आंतरराष्ट्रीय सामन्यात (विंडीजविरुद्ध कसोटी) सोबत खेळले आणि एकूण १०८ कसोटी व २१४ वन डे सामने ते एकत्र खेळले.

एरिक वअॕलेक बेडसर
त्यांच्याआधीचे नावाजलेले जुळे बंधू म्हणजे इंग्लंडचे एरिक व अॕलेक बेडसर.यापैकी अॕलेक हा जलद गोलंदाज तर एरिक हा फिरकी गोलंदाज; पण कोण कशा प्रकारची गोलंदाजी करेल हे त्यांनी नाणेफेक करून ठरवून घेतले होते. ४ जुलै ही त्यांची जन्मतारीख. यापैकी अॕलेक ५१ कसोटी सामने खेळला आणि २३६ बळी त्याने आपल्या नावावर नोंदवले. एरिकला मात्र तेवढे यश मिळाले नाही.

रेनी शेविल व फर्नी ब्लेड
महिलांच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी कसोटी सामन्यात रेनी शेविल व फर्नी ब्लेड या जुळ्या बहिणी खेळल्या. फर्नी ही जलद गोलंदाज तर रेनी ही यष्टिरक्षक. दोघींची जन्मतारीख २० ऑगस्ट २०१०

अॕलेक्स व केट ब्लॕकवेल
ऑस्ट्रेलियाच्याच अॕलेक्स व केट ब्लॕकवेल ह्या नुसत्या जुळ्या बहिणीच नाही तर एकसारख्याच दिसणाऱ्या जुळ्या बहिणी (Identical twins). २००४ मध्ये त्या वन डे सामन्यात एकत्र खेळल्या. ३१ ऑगस्ट १९८३ ही त्यांची जन्मतारीख. दोन्ही मधल्या फळीच्या फलंदाज आणि दोन्ही २००५ मध्ये विश्वविजेत्या ठरल्या.

हमिश व जेम्स मार्शल
ब्लॕकवेल भगिनींप्रमाणेच न्यूझीलंडचे हमिश व जेम्स मार्शल हे आयडेंटीकल व्टिन जुळे भाऊ. कसोटी सामना सोबत खेळलेले हे पहिले आयडेंटीकल व्टिन. २००५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आॕकलंड कसोटीत ते सोबत खेळले.

एलिझाबेथ व रोझ सिग्नल
एलिझाबेथ आणि रोझ सिग्नल या आणखी कसोटी सामना सोबत खेळलेल्या जुळ्या बहिणी. १९९१ मध्ये त्या न्यूझीलंडसाठी इंग्लंडविरुद्ध हेडिंग्ले कसोटीत खेळल्या.

किशोना व किशिया नाईट
वेस्ट इंडीजच्या किशोना नाईट व किशिया नाईट ह्या जुळ्या बहिणी. २०१६ च्या टी-20 विश्वचषक विजेत्या संघाच्या त्या सदस्य. यांचे वैशिष्ट्य हे की बार्बेडोससाठी त्या अॕथलेटिक्स व फुटबॉलही खेळल्या पण रमल्या क्रिकेटमध्ये.

सेसिलिया व इसोबेल जाॕयस
आयर्लंडच्या सेसिलिया व इसोबेल जाॕयस ह्या प्रसिद्ध जाॕयस क्रिकेट घराण्याच्या सदस्य. एड जाॕयस ह्याच्या ह्या बहिणी…अर्थात जुळ्या! आयर्लंडच्या पहिल्या कसोटी सामन्यात जुलै २००० मध्ये इसोबेल सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरली होती. २०१७ मध्ये तर एका सामन्यात सेसिलियाने इसोबेलच्या गोलंदाजीवर झेल घेतला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button