
औरंगाबाद :- शहरातील बारा हजार परप्रांतीयांना आतापर्यंत स्वगृही पाठविण्यात आले आहे. एका बसमध्ये प्रत्येकी २५ जण अशा २१० बसेसमधून चार हजार तर रेल्वेतून नऊ हजार मजूरांना पाठविण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त मीना मकवाना यांनी दिली. आता परप्रांतीयांची संख्या कमी आहे. ज्यांना स्वगृही जायचे आहे अशा काही जणांचे मोबाईल सध्या बंद येत आहेत. तर पश्चिम बंगालचे दोनशे जण सध्या संपर्कात आहेत. पण तेथे वादळाचा धोका असल्याने त्यांना पाठवणे शक्य नाही. बाहेरगावी जाण्यासाठी आतापर्यंत तीन हजार आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी निम्म्या नागरिकांना परवानगी देण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या.
ही बातमी पण वाचा : मिरज तालुक्यातून परप्रांतीय झारखंडला रवाना
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला