बारावीची परीक्षा लांबणीवर तर दहावीची परीक्षा रद्द; सीबीएसई बोर्डाचा निर्णय

CBSE Exam - Maharastra Today
CBSE Exam - Maharastra Today

नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सीबीएसई बोर्ड परीक्षांच्या संदर्भात १२ वाजता बैठक घेतली. या बैठकीत केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, सीबीएसईचे सचिव उपस्थित होते. यात सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दहावीची परीक्षा रद्द केली आहे. सीबीएसई बोर्डाने वस्तुनिष्ठपणे तयार केलेल्या मानाकांच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर केला जाईल. तर, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षासंदर्भात १ जूनला परिस्थितीची पाहणी करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिली आहे.

सीबीएसई बोर्डाच्या लेखी परीक्षेला ४ मेपासून सुरुवात होणार होती. मात्र, देशात एक लाखापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षा रद्द करा, अशी मागणी सोशल मीडियावर (Social Media) केली होती. विद्यार्थ्यांच्या या मागणीला अभिनेता सोनू सूद, गायक अरमान मलिक, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी परीक्षा रद्द करावी किंवा दुसरा मार्ग काढण्यात यावा, अशी मागणी केली होती. झालेल्या बैठकीत सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा तर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या एक लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करा किंवा ऑनलाईन पद्धतीने घ्या, अशी मागणी केली आहे. मात्र, सीबीएसईने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना केल्याची माहिती दिली आहे. सीबीएसईच्या लेखी परीक्षांना ४ मेपासून सुरुवात होणार आहे.

Check in PDF:- बारावीची परीक्षा लांबणीवर तर दहावीची परीक्षा रद्द; सीबीएसई बोर्डाचा निर्णय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button