प्रहार जनशक्तीचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांची गोळी घालून हत्या

Tushar Pundkar shot dead

अकोला :- ‘प्रहार जनशक्ती पक्षा’चे अकोला जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर अकोट शहरातील पोलीस वसाहतीजवळ गोळीबार झाला. यात तुषार पुंडकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान हा गोळीबार कोणी केला याबाबत सध्या तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १०.३० वाजताच्या सुमारास पुंडकर यांच्यावर अकोट शहरातल्या पोलीस वसाहतीजवळ अज्ञातांनी गोळीबार केला. या गोळीबारात पुंडकर गंभीर जखमी झाले. त्यांना अकोला शहरातल्या आयकॉन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर हल्ला झाल्याचं समजताच शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू हे अकोटकडे रवाना झाले. मात्र मध्यरात्री ३ वाजताच्या दरम्यान पुंडकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर आज दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

ही बातमी पण वाचा : डॉ पायल तडवी आत्महत्या प्रकरण : न्यायालयाकडून आरोपी महिला डॉक्टरांना इस्पितळ परिसरातील प्रवेशबंदी कायम

पुंडकर यांच्यावर हा हल्ला जुन्या वादातून झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. घटनास्थळावरून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या हल्ल्यामागची नेमकी कारणं कोणती याचा तपास पोलीस करीत आहेत. हल्ल्यानंतर दोन्ही मारेकरी दुचाकीने पसार झालेत. या प्रकरणी अकोट शहर पोलिसांनी आरोपींच्या धरपकडीसाठी नाकाबंदी सुरू केली आहे.


Web Title : Tushar Pundkar murder case : Prahar janashakti’s Former district president Tushar Pundkar was shot dead and killed

Maharashtra Today : Online Marathi News Portal