उद्धव ठाकरेंना 40 दिवसांमध्ये मुख्यमंत्रीपद सोडावं लागेल : आचार्य तुषार भोसले 

Uddhav Thackeray - Acharya Tushar Bhosale

नसिक : भाजपचे अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Tushar Bhosale)यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यावर सडकून टीका केली आहे .

उद्धव ठाकरे यांना साधू हत्येचं पातक फेडावं लागेल. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना साधुंचे तळतळाट भोवले. आता येत्या 40 दिवसांत त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागेल, असं वक्तव्य आचार्य तुषार भोसले यांनी केलं आहे.

अनिल देशमुख यांना साधू हत्येचा तळतळाट लागला तसेच तुम्हालाही पाप फेडावे लागणार आहे. आता पुढचा नंबर उद्धव ठाकरे यांचा आहे. ठाकरे सरकारची उलटगणती सुरु झाली आहे. 40 दिवसांच्या आत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल, असा दावा आचार्य तुषार भोसले यांनी केला.

आम्ही 2024 मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहोत. कुणाच्याही कुबड्या आम्हाला नकोत, असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button