पाणी वळवा, पूर-दुष्काळ टाळा; नितीन गडकरींचे उद्धव ठाकरेंना पत्र

Nitin Gadkari & Uddhav Thackeray

मुंबई : पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्यात ‘स्टेट वॉटर ग्रीड’ तयार करा, अशी सूचना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून केली आहे.

गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटले आहे की, राज्यात दरवर्षी पूर येतो, दुष्काळ पडतो. त्यामुळे नियोजन करून पुराचे पाणी वळवा.

नितीन गडकरी यांनी आधीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वाहून जाणाऱ्या पाण्यातून सिंचनाची कामे हाती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्यात नॅशनल पॉवर ग्रीडच्या धर्तीवर स्टेट वॉटर ग्रीड तयार करण्याचा सल्ला दिला.

राज्यात दरवर्षी महापूर येतो. त्यामुळे खूप नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी राज्यात नॅशनल पॉवर ग्रीडच्या धर्तीवर स्टेट वॉटर ग्रीड तयार करता येऊ शकते. स्टेट वॉटर ग्रीड करून पुराचे पाणी एका नदीतून दुसऱ्या नदीत वळवा आणि दुष्काळी भागात आणा. अशा प्रकारे स्टेट वॉटर ग्रीड अस्तित्वात आले तर सिंचन वाढेल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, असे गडकरी यांनी म्हटले आहे.

आधीचे पत्र

मुंबईतील पूर समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा, असे गडकरींनी म्हटले आहे. पूरस्थितीमुळे दरवर्षी मुंबईमध्ये जीवितहानी, वित्तहानी, इमारतींची पडझड, रस्त्यांचे नुकसान होते. मुंबईतील पुरांबाबत योग्य कार्यवाही करुन वर्षानुवर्षे या संकटाला तोंड देणाऱ्या मुंबईकरांना दिलासा द्या.

मुंबईत ड्रेनेज वॉटर आणि गटरलाईनच्या पाण्याचे योग्य नियोजन करा, ड्रेनेज वॉटर आणि गटरलाईनच्या पाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा वापर करा, पुराचे पाणी, ड्रेनेज, गडरलाईनचे पाणी ठाण्याकडे वळवून धरणात साठवता येईल. तिथे पाण्यावर प्रक्रिय करून नाशिक आणि अहमदनगर मधील शेतीला पाणी देता येईल, असेही गडकरींनी सुचवले आहे. पुराचे पाणी दुष्काळी भागात देखील वळवता येईल, असेही त्यांनी म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER