हळद : स्वयंपाकघरातील औषधी गुणयुक्त सोनं

turmeric

हळद, याचा परिचय, शरीराला आवश्यक औषधी गुण भारतीयांना नवीन नाही. पूर्वापार हळद आपल्या आरोग्याकरिता वापरण्यात येते आहे. लग्नसमारंभ असला की हळद लावणे हा एक महत्त्वाचा रिवाज असतो. त्वचेला उपयोगी अनेकविध द्रव्यांमध्ये फक्त हळदच वापरली जाते. म्हणजेच इतका चांगला प्रभाव या हळदीचा आपल्या शरीरावर, वर्णावर होतो.

मध्यंतरी turmeric Latte नावाने खूपच प्रसिद्धीस आलेले आपले हळदीचे दूध किती चांगले हे बाहेरचे लोक आपल्याला सांगत सुटले. आणि आपल्याकडे मात्र लहानपणापासून सहजरीत्या हळदीचे दूध घेतले जाते.

कुठलीही जखम, मुका मार, रक्तस्राव झाला की लगेच हळद लावली जाते. आपल्याला अगदी अंगवळणी पडलेल्या गोष्टी आहेत. हरिद्रा (शरीराचा वर्ण ठीक करणारी) कांचनी ( सोन्याप्रमाणे पितवर्णी) निशा, वरवर्णिनी, गौरी, कृमिघ्ना, योषितप्रिया, हट्टविलासिनी अशी विविध नावे आयुर्वेदात (Ayurveda) हळदीकरिता आली आहेत.

हळद व्रण ठीक करणारी, रक्तस्राव थांबवून जखम बरी करणारी, त्वचाविकारांवर उत्तम औषध, कृमीनाशक तसेच त्रिदोष कमी करणारी आहे.

 • उटण्यात हळदीचा वापर वर्ण उजळ करते. काळे डाग असल्यास नष्ट करते.
 • कुठे मुका मार लागल्यास हळद आंबेहळद गरम करून लावलेला लेप आराम देतो.
 • कुठे पूय निर्माण झाला असेल, गळवे असल्यास हळद पूयाचे शोषण करून फोडं बरे करते.
 • बाळंतिणीला ओवा-हळदीचा धूपन व्रण बरे करणारे आहे.
 • पोटात जंत होण्याची प्रवृत्ती हळदीच्या सेवनाने कमी होते.
 • कावीळ, जंतविकार, जलोदर पांडू रक्त कमी असणे या विकारांमध्ये अनेक औषधी
 • कल्पांमध्ये हरिद्रा वापरली जाते.
 • कावीळ रोगात हळद खाऊ नये हा गैरसमज आहे.
 • हळद इन्फेक्शन कमी करते. यकृताचे कार्य सुधारते.
 • कफ कमी करणारी असल्याने प्रतिश्याय, खोकला, आवाज बसणे, घसा खवखवणे या
  विकारात गुळण्या तसेच हळद-मधाचे चाटण आराम देते.

शीतपित्त, अंगावर पित्त उठणे, अतिशय खाज सुटणे या विकारात हळद, हरिद्रा खंडसारखी औषधे खूप उपयोगी ठरते. प्रमेहातील हळद मुख्य औषध आहे. ओल्या हळदीचा रस, आवळा रस उपयोगी पडतो.

इतक्या विविध प्रकारे उपयुक्त ही हळद भाज्यांना चव, रंग आणणारी, औषधी गुणाची त्रिदोष विकारांना दूर ठेवणारी, मांगलिक कार्यात प्रमुख असणारी आहे.

ही बातमी पण वाचा : जायफळ – सुगंधी व उपयोगी मसाला द्रव्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER