तूर खरेदीची मर्यादा वाढणार : आमदार सावंत यांना पणनमंत्र्यांचे आश्वासन

Patil to Sawant

सांगली :- जत तालुक्यात तुरीचे अधिक प्रमाणात उत्पादन घेतले जाते. खरेदी केंद्रावर हेक्टरी अडीच क्विंटलच घेतली जाते. उर्वरीत तुर बाजारात कवडीमोल भावाने विकावी लागत असल्याने तूर खरेदीची मर्यादा वाढविण्याची मागणी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली. पणन विभागाकडून माहिती घेवून तूर खरेदीची मर्यादा वाढविण्याबाबतचा निर्णय निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन पणनमंत्री पाटील यांनी बुधवारी दिले आहे.

ही बातमी पण वाचा :  कोण पाहिजे? सावरकर की शेतकरी?

शेतकर्‍यांच्या तुरीला योग्य भाव मिळावा, यासाठी प्रत्येकवर्षी तूर हमीभाव केंद्र सुरू केले जाते. यावर्षीही सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. शासनाने प्रती शेतकरी हेक्टरी 2.57 क्विंटल तूर खरेदीचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसारच तूर खरेदी होईल, असे जिल्हा मार्केटिंगअधिकारी सांगत आहेत. जत तालुक्यातील अनेक गावात तुरीचे उत्पादन घेतले जाते. एकरी तीन ते चार क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळते. त्यामुळे हेक्टरी आठ ते नऊ क्विंटल उत्पादन होते. खरेदी केंद्रावर अडीच क्विंटल तूर खरेदी केली जाते. त्यामुळे उर्वरित तुरीची बाजारात विकावी लागते. बाजारात तुरीचा भाव 4 हजार 500 ते 5 हजार रुपयांपर्यंत खाली आला आहे. तुरीचा हमीभाव क्विंटलला 5 हजार 800 रुपये आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी जत तालुक्यातील शेतकर्‍यांनी सांगलीतील तूर खरेदी केंद्र बंद पाडले होते.


Web Title : Tur purchase limit will increase – Vikramsingh Sawant

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Sangli City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Mumbai City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)