
पुणे : तुळशी विवाहाच्या पार्श्वभूमीवर घराघरातील तुळशी वृंदावनाची साफसफाई व रंगरंगोटी करत. घराघरांतील तुलसी वृंदावन सजले. अनेकांनी बाजारातील तयार मातीच्या व प्लास्टिकच्या कुंड्या आणून सजावट केली असून, घरोघरी हा विवाहसोहळा मोठ्या थाटात साजरा झाला.
तुळशीचा विवाह सोहळा गुरुवारी सायंकाळी साजरा राज्यभर साजरा झाला. त्यासाठी शहर आणि ग्रामीण दिवसभर तयारीची लगबग सुरू होती. शहरासह ग्रामीण भागात तुलशी विवाह उत्साहात साजरा केला. उसाचे मांडव (चौक) घातले होते. अंगणात सडा रांगोळीचे गालिचे सजला होता. तुलसी वृंदावन फुलापानांच्या माळांनी सजवले गेले.
तुलशी विवाहासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांत सकाळी गर्दी केली होती. फटाके, फुलांच्या राशींसह ऊस, पूजेचे साहित्य ,चिरमुरे, बेंडबत्तासे, आवळे, चिंच, मनी- मंगळसूत्र, हळदीचे कापड, हिरव्या बांगड्या, विवाहाचे ओटीचे साहित्य वस्त्र, फुलांच्या तयार माळांची विक्री चांगली झाली.
दरम्यान, सोशल मीडियावरून आवाहन यंदा तुळशी विवाह कोरोना तसेच २६/११ च्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले होते. जवानांनी सीमेवर आपल्या संरक्षणार्थ जीव गमावला आहे. या घटना ताज्या असतानाच फटाके, आतषबाजी करून तुळशी विवाह साजरा करण्याऐवजी शहिदांना आदरांजली वाहून शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते, सुज्ञ नागरिकांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला