तुळशी आणि विहार तलाव भरले

तुळशी आणि विहार हे दोन तलाव

मुंबई :  मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार (Vihar Lake) आणि तुळशी (Tulsi) या सात तलावांपैकी तुळशी आणि विहार हे दोन तलाव भरले असून, अद्यापही पाच तलाव भरलेले नाहीत. पाचही तलाव भरेपर्यंत मुंबईत लागू करण्यात आलेली २० टक्के पाणीकपात कायम राहणार आहे. विहार तलाव ५ ऑगस्‍ट रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागला आहे.

२७,६९८ दशलक्ष लिटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव गतवर्षी ३१ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. त्‍याआधी २०१८ मध्‍ये १६ जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहला होता. विहार तलाव हा सर्वांत लहान दोन    तलावांपैकी एक असून यापैकी दुसरा तुळशी तलाव हा सर्वांत लहान तलाव आहे. विहार तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लिटर (९ कोटी लिटर) पाण्‍याचा पुरवठा केला जातो.

गेल्या काही दिवसांत या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव वाहू लागला आहे. पावसाळ्यामध्‍ये जून व जुलै महिन्‍यात मुंबईस पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव (Lakes) क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पर्जन्‍यवृष्‍टी झाली आहे. यामुळे जुलै महिन्‍याच्‍या शेवटच्‍या आठवड्यात मुंबईस पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्‍ये फक्‍त सुमारे ३४ टक्‍के पाणी आहे. यात जुलै २०१९ मध्‍ये ८५.६८ टक्‍के व जुलै २०१८ मध्‍ये ८३.३० टक्‍के पाणी होते. मुंबईचा पाणी पुरवठा ३१ जुलै २०२१ पर्यंत सुरळीपणे चालू ठेवण्‍यासाठी पाणी पुरवठ्यात ५ ऑगस्‍टपासून २० टक्‍के पाणी कपात करण्‍यात आली आहे.

ही बातमी पण वाचा :मुंबई; ११ ऑगस्टला पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER