कोरोनामुळे तुळजापूरच्या भवानीमातेचा नवरात्रोत्सव रद्द

Tuljapur's Navratri festival canceled due to corona

तुळजापूर : कोरोनाच्या (Corona) साथीमुळे तुळजापुरातच्या भवानीमातेचा नवरात्र महोत्सव (Navratri festival) रद्द करण्यात आला आहे. याआधी कोरोनामुळेच चैत्री पौर्णिमा यात्रा रद्द करण्यात आली होती. मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थानच्या बैठकीत हा निर्णय घोषित घेतला.

गेल्या ६ महिन्यापासून तुळजाभवानी मंदिर बंद आहे. नवरात्र उत्सव रद्द केल्याने मंदिराच्या अर्थव्यवस्थेवर व्यवसाय अवलंबुन असलेल्या लहान व्यापारी – दुकानदारांची काळजी वाढली आहे. त्यांचा अर्थिक अडचणी वाढणार आहेत. ते मंदिर उघडण्याची वाट पाहत आहेत. गर्दी टाळण्यासाठी नवरात्र महोत्सव कालावधीत भाविकांना शहराबाहेरच रोखण्यात येईल. कोरोनाचा पहिला फटका चैत्र पौर्णिमेला बसला होता. त्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्या, लग्नसराई या कालावधीत मंदिर बंद असल्याने पुजारी, व्यावसायिकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. सर्वांच्या आशा आगामी नवरात्र महोत्सवावर होत्या.

नवरात्र महोत्सवात पंधरा – वीस दिवस शहरातील दुकाने २४ तास खुली असतात. दिवस – रात्र भाविकांची प्रचंड वर्दळ असल्याने चांगला व्यवसाय होतो. नवरात्र महोत्सवाच्यानंतर दीपावलीच्या सुट्टीतही भाविकांची मोठी गर्दी असते. नवरात्र महोत्सवातील केवळ पंधरा दिवसांच्या व्यवसायावर दुकानदार, दुकानांचे भाडे, व्यापाऱ्यांची देणी भागवत असतात; बाकी वर्षभर नफा कमावला जातो.

नवरात्रात येथे पंधरा – वीस लाख भाविक महाराष्ट्रासह शेजारच्या आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा व इतर भागातून येतात. ललित पंचमी, नवरात्रातील मंगळवार, शुक्रवार, रविवारी दर्शनासाठी गर्दी असते. अश्विन पोर्णिमा आणि घटस्थापनेपूर्वी ज्योत नेण्यासाठीही मोठी गर्दी असते.

शारदीय नवरात्र महोत्सव ९ ते ३१ ऑक्टोबर आहे. ९ ऑक्टोबरला सायंकाळी देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ होही. १७ ऑक्टोबरला पहाटे तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना, दुपारी १२ वाजता घटस्थापननेने नवरात्रास प्रारंभ होणार आहे. २५ ऑक्टोबर दुपारी १२ वाजता होम व धार्मिक विधि, घटोत्थापना २६ऑक्टोबर उषःकाली सीमोल्लंघन सोहळा व नंतर देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ हाेणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER