नागपुरातील सहा प्रतिबंधित क्षेत्रांतील निर्बंध मागे : आयुक्त तुकाराम मुंढेंची माहिती

Tukaram Mundhe

नागपूर : राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात २५ हून अधिक परिसरात निर्बंध घालण्यात आले आहेत. मंगळवारी प्रथमच सहा परिसरातील निर्बंध हटविण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले. यात सतरंजीपुरा झोन क्षेत्रातील तीन, मंगळवारी झोनमधील एक, आशीनगर व गांधीबाग झोनमधील प्रत्येकी एका परिसराचा समावेश आहे.

ही बातमी पण वाचा:- कोरोना चाचणीसाठीची  4,500 रुपयाची मर्यादा हटवली..

नियमानुसार २८ दिवसांपर्यंत नवीन संक्रमित रुग्ण आढळून न आल्यास परिसरातील निर्बंध हटविले जातात. या नियमाचे पालन करीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी यासंदर्भात आदेश जारी केले. निर्बंध हटविण्यासोबतच परिसर मुक्त करण्यात आला. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. निर्बंध हटविण्यात आलेला परिसर लालगंज, दलालपुरा प्रभाग २१- सतरंजीपुरा झोन, गौतमनगर, प्रभाग १०- मंगळवारी झोन, राजीव गांधीनगर, प्रभाग ३- आशीनगर झोन, भालदारपुरा, प्रभाग १९- गांधीबाग झोन, कुंदनलाल गुप्ता नगर, प्रभाग ५-सतरंजीपुरा झोन, शांतिनगर प्रभाग २१- सतरंजीपुरा झोन आहेत .


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER