तुकाराम मुंढेंनी घेतली कोरोना लस

Tukaram Mundhe

मुंबई : राज्यात सध्या कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. तर दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीमही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात राजकारण्यांसह अधिकारीही लस टोचून घेत आहेत. आज राज्य मानवाधिकार आयोगाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याची माहिती देत तुकाराम मुंढे म्हणाले की, आज जे.  जे.  हॉस्पिटलमध्ये लस घेतल्याने आनंद झाला. सर्वांनी ही लस घ्यावी. या कठीण काळात विशेष भूमिका बजावण्याकरिता पॅरामेडिकल बंधू-भगिनींचे मी आभार मानतो. कोविड व्हॅसिन बनवण्यासाठी हातभार लावून आणि लसीकरणासाठी इतर देशांना साहाय्य करून भारताने मोठा सन्मान मिळवला, असेही मुंढे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER