तुकाराम मुंढे म्हणतात, ‘ऑल इज वेल’

Tukaram Mundhe

नागपूर : नागपूरचे माजी आयुक्त आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी फेसबुक पोस्टद्वारे नागरिकांना खास आवाहन केलं आहे. कोणतीही लक्षणं नसताना मी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह (Corona positive) आढळून आलो आहे. त्यामुळे मी शासनाच्या सर्व गाईडलाइन्स पाळत आहे. तुम्ही सर्वांनीदेखील गृहविलगीकरणाच्या दिशानिर्देशांचं पालन करावं, असं आवाहन तुकाराम मुंढे यांनी केलं आहे.

तुकाराम मुंढे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं, मागील साडेपाच महिने कोरोनाशी लढत असताना २४ ऑगस्ट रोजी माझी कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली. लक्षणे नसल्यामुळे मात्र पॉझिटिव्ह आल्याने शासनाच्या गाईडलाइन्सनुसार मी स्वतःला गृहविलगीकरणात ठेवले. या काळात गृहविलगीकरणाचे सर्व नियम मी पाळत आहे.

मास्क लावणे, कुटुंबातील कुठलाही सदस्य मी असलेल्या खोलीत न येणे, व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स आणि झिंक गोळ्यांचे सेवन करणे, थर्मल स्कॅनिंगद्वारे ठरावीक काळानंतर शरीराचे तापमान तपासणे आदी सर्व दिशानिर्देशांचे पालन करीत आहे. ज्यांना-ज्यांना लक्षणे नाहीत मात्र ते पॉझिटिव्ह आले आहेत, अशा सर्वांनी गृहविलगीकरणाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे. आपणापासून इतरांना संक्रमण होणार नाही, याची काळजी घ्यावी. ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि आपणा सर्वांच्या शुभेच्छा सोबत आहेतच. या शुभेच्छासोबतच सर्व नियम पाळत विलगीकरणाचा काळ मी पूर्ण करेन, असा विश्वास देतो.
All is Well !

ज्यांना-ज्यांना लक्षणे नाहीत मात्र ते पॉझिटिव्ह आले आहेत, अशा सर्वांनी गृह विलगीकरणाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे. आपणापासून इतरांना संक्रमण होणार नाही, याची काळजी घ्यावी.

ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि आपणा सर्वांच्या शुभेच्छा सोबत आहेतच. या शुभेच्छासोबतच सर्व नियम पाळत विलगीकरणाचा काळ मी पूर्ण करेन, असा विश्वास देतो.
All is Well…!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER