कोरोना नियंत्रणासाठी तुकाराम मुंढेंना नागपुरात परत पाठवा, शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Tukaram Mundhe-CM Uddhav Thackeray.jpg

नागपूर : सध्या उपराजधानी नागपुरात (Nagpur news) कोरोनाचा (Corona virus) उद्रेक बघायला मिळत आहे. दररोज दीड हजारांच्या वर नवे रुग्ण आढळून येत आहेत. तर मृत्यूंची संख्याही वाढतच चालली आहे. त्यामुळे नागपुरात कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी कडक शिस्त आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ख्याती असलेले तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची परत नागपुरात बदली करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे.

नुकतीच मुंढे यांची नागपूर पालिका आयुक्तपदावरुन बदली झाली आहे. मात्र नागपुरात कोरोना रुग्णांची आणि मृत्यूंची वाढत चाललेली संख्या लक्षात घेता, त्यांची बदली रद्द करुन, पुन्हा नागपूर महापालिका आयुक्तपदी नियुक्त करा, अशी मागणी शिवसेनेचे नागपूर उपजिल्हाप्रमुख आणि नगरसेवक किशोर कुमेरिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अथक प्रयत्न करुनही कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत नाही. आरोग्य यंत्रणा पुरती कोलमडली आहे. तुकाराम मुंढे महापालिका आयुक्त असताना नागपुरात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती. त्यामुळे त्यांची पुन्हा नागपुरात आयुक्त म्हणून बदली करा, असं किशोर कुमेरिया यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER