राम मंदीरसाठी ट्रस्ट तर मशिदीसाठी का नाही : शरद पवारांचा सवाल

Sharad Pawar

लखनऊ :- देश सर्वांचाच आहे. “तुम्ही जसे राम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना करू शकता, मशिदीच्या उभारणीसाठी ट्रस्ट का निर्माण करू शकत नाही? ” असा प्रश्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला केला असल्याचे वृत्त एका वृत्त वाहिनीने वृत्त दिले आहे. दिल्लीत या ट्रस्टची आज पहिली बैठक पार पडली. लखनऊ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्यस्तरीय संमेलनाप्रसंगी शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशमधील भाजपा सरकारवर निशाणा साधत आरोप केला की, लोकांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याच काम सरकारकडून केले जात आहे.

पवारांनी दिले उद्धव ठाकरेंना अभयदान

उत्तर प्रदेशच्या अर्थसंकल्पात शेतक-यांसाठी काहीच नसल्याचे पवार म्हणाले. बेरोजगारांना मासिक प्रशिक्षण भत्ता देणार असल्याचे सांगितले आहे, मात्र हा भत्ता मिळेल की नाही याबाबत देखील काही सांगणे अवघड असल्याचे पवार म्हणाले. भाजपावर टीका करताना पवार म्हणाले, लोकांमध्ये फुट पाडून राज्य करा हे भाजपाचे धोरण आता जनतेने चांगल्याप्रकारे ओळखले आहे. जनता आता तुमच्या थापांना बळी पडणार नाही. सीएए आणि एनआरसीमध्ये काही त्रुटी आहेत, यामध्ये मुस्लीम अल्पसंख्यांकांकडे दुर्लक्ष केलं गेले असल्याचेही पवारांना यावेळी सांगितले.