इंदोरीकर महाराजांना तृप्ती देसाईंची नोटिस, जाहीर माफीची मागणी

Trupti Desai - Indurikar Maharaj

शिर्डी : इंदोरीकर महाराजांना भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी कायदेशीर नोटिस पाठवली आहे. इंदोरीकर महाराजांनी येत्या दहा दिवसांत जाहीर माफी मागितली नाही, तर न्यायालयात त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात येईल, असे देसाई यांनी यामध्ये म्हटले आहे.

मुंबईत उड्डाणपूल, महामार्गांवर वाहन चालवित असाल तर… होशियार!

तृप्ती देसाईंनी आपल्या वकिलामार्फत ही नोटिस जारी केली आहे. महिलांचा अपमान केल्यामुळे इंदोरीकर महाराजांनी जाहीर माफी मागावी. महिलांचा अपमान करणारी वक्तव्ये कीर्तनात यानंतर करणार नाही, असे त्यांनी जाहीर करावे, असे देसाईंनी या नोटिसमध्ये म्हटले आहे. आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असून, आपले चारित्र्यहनन मागील आठ दिवसांपासून सुरू आहे, असेही देसाईंनी म्हटले आहे. इंदोरीकर महाराजांच्या संगमनेर तालुक्यातील पत्त्यावर ही नोटिस पाठविण्यात आली आहे.