ट्रम्प यांचा ‘सुपरफॅन’ बुसा कृष्णाचे निधन

Busa Krishna - Donald Trump

मेडक : नेते प्रसिद्धच असतात; पण त्यांचे बहुसंख्य चाहते मात्र कधी प्रसिद्धीच्या झोतात येत नाहीत. काही वैशिष्ट्य जपणारे चाहते याला अपवाद असतात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा असाच चाहता होता बुसा कृष्णा. तेलंगणातील मेडक जिल्ह्यातील जनगाव येथे राहणाऱ्या बुसा कृष्णाचे आज (रविवारी) हृदयविकाराने निधन झाले. त्याची बातमी झाली! कारण, बुसा कृष्णाचे (Busa Krishna) ट्रम्प यांच्याबाबतचे झपाटल्यासारखे प्रेम.

बुसा कृष्णा हा ट्रम्प यांना देव मानायचा. गेल्या वर्षी ट्रम्प यांच्या जन्मदिनी १४ जूनला त्याने ट्रम्प यांचा ६ फूट उंच पुतळा (मूर्ती) स्थापन केला. दुधाने अभिषेक केला. तो ट्रम्प यांचे छायाचित्र नेहमी सोबत ठेवायचा. कोणतेही नवे काम सुरू करायच्या आधी, काम यशस्वी व्हावे म्हणून ट्रम्प यांना नवस करायचा! ट्रम्प यांचा ‘सुपरफॅन’ अशी बुसा कृष्णाची ओळख झाली होती. बुसा याला ट्रम्प यांना भेटायचे होते. त्याने ही इच्छा सरकारला कळवली होती.

कृष्णाच्या ट्रम्प यांच्यावरील भक्तीमुळे लोक त्याला ‘ट्रम्प कृष्णा’ आणि त्याच्या घराला ‘ट्रम्प हाऊस’ म्हणायचे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER