ट्रम्पचा अकाउंट बंद, ट्विटरवर मोदी नंबर वन !

Donald trump & Pm Modi

नवी दिल्ली : अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष ट्रम्प (Donald Trump) यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेबाहेर घातलेल्या गोंधळामुळे ट्विटरने (Twitter) अकाउंट बंद केले. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले राजकीय नेते झाले आहेत.

ट्रम्प यांनी ट्विटमध्ये वापरलेली भाषा चिथावणीखोर असल्याने ट्विटरने ट्रम्प यांचे अकाउंट बंद केले. ट्विटवर सर्वाधिक फॉलोअर्स असण्याचा मान थोड्या दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी ट्विटर खात्याला ८८.७ मिलियन म्हणजेच ८ कोटी ८७ लाख लोक फॉलो करतात. सर्वाधिक ट्विटर फॉलोअर्स असणाऱ्या नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदी दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांच्या फॉलोअर्सची संख्या ६४.७ मिलियन म्हणजेच ६ कोटी ४७ लाख आहे. मात्र आता ट्रम्प यांचे खातंच बंद करण्यात आल्यानं मोदी ट्विटवर सर्वाधिक फॉलो असलेले नेते झाले आहेत.

अमेरिकेच्या संसदेत ट्रम्प यांच्या समर्थकांनी धुमाकूळ घातला. ट्रम्प यांनी चिथावणी दिल्यानंच हा प्रकार घडल्याचा आरोप झाला. त्यामुळे ट्विटरनं ट्रम्प यांचे ट्विट काढून टाकत त्यांना ब्लॉक केले. त्यानंतर त्यांचे खाते कायमस्वरुपी बंद केले. ट्रम्प त्यांचे खाते चिथावणी देण्यासाठी वापरू शकतात त्यामुळे ते बंद करत असल्याची माहिती ट्विटरने दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER