दहशतवाद आवरा; ट्रम्प यांचा पाकिस्तानला इशारा

Donald Trump-Imran Khan

अहमदाबाद :- आमच्या प्रयत्नामुळे पाकिस्तान थोडा सुधारला आहे. मात्र, पाकिस्तानने त्याच्या जमिनीवरून होणाऱ्या दहशतवादी कारवाया त्वरित थांबवाव्या, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला दिला. दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या ट्रम्प यांनी गुजरातमधील अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये आयोजित स्वागताच्या कार्यक्रमात पाकिस्तानला सुनावले.

ट्रम्प म्हणाले – “पाकिस्तानातील दहशतवाद संपवण्यासाठी माझे सरकार प्रयत्न करत आहे. कट्टर इस्लामिक दहशवाद संपवण्यासाठी अमेरिका आणि भारत सोबत काम करतील. भारत-पाकिस्तान सीमेवरील दहशतवादी तळ संपवण्यासाठी आम्ही पाकिस्तानबरोबर काम करत आहोत. आमचे पाकिस्तानबरोबरचे संबंध सुधारत असले तरी त्यांनी दहशतवादी कारवायांसाठी आपली जमीन वापरू देऊ नये. दहशतवादापासून सामान्य नागरिकांना वाचवण्यासाठी आम्ही दोघे एकत्र काम करू. पाकिस्तानसोबत मिळून सीमेपलीकडील दहशतवाद संपवण्याचा प्रयत्न सुरू ठेवू.”

साबरमती आश्रमात ट्रम्प दांपत्याने केली सूतकताई

दहशतवादविरोधाच्या मुद्यांवर भारताला पाठिंबा व्यक्त करताना ट्रम्प म्हणाले की – “प्रत्येक देशाला आपल्या सीमांचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे.” या संदर्भात त्यांनी पाकिस्तानमधील दहशतवादी गटांची नावे घेऊन पाकिस्तानवर टीका केली.

कट्टर इस्लामिक दहशतवाद संपवण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करतील, असा विश्वास व्यक्त करताना ट्रम्प यांनी आयसिसचा उल्लेख केला. “आम्ही आयसिसचा १०१ टक्के खात्मा केला आहे. भविष्यातही इस्लामिक दहशतवादाविरुद्ध दोन्ही देश लढत राहतील, असा माझा विश्वास आहे. ” असंही ट्रम्प म्हणाले.


दोन देशांमधील संबंध दृढ

भारत आणि अमेरिकेचे संबंध दिवसोंदिवस दृढ होत आहेत, असे सांगताना ट्रम्प म्हणाले – अमेरिकन नागरिकांना भारतीयांबाबत प्रेम वाटते. भारत आणि अमेरिका यांच्यात आज मैत्रीचे संबंध अतिशय दृढ झाले आहेत.


Web Title : Trump warns pakistan visit india

Maharashtra Today : Online Marathi News Portal