ट्रम्प यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच व्हाइट हाऊसबाहेर गोळीबार

वॉशिंग्टन : व्हाइट हाऊसमध्ये आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची पत्रकार परिषद (press conference) सुरू असताना व्हाइट हाऊसबाहेर गोळीबार झाला. सिक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सनी ट्रम्प यांना या घटनेची माहिती दिली व व्हाइट हाऊसच्या पत्रकार कक्षातून बाहेर नेले.

व्हाइट हाऊसच्या सुरक्षा रक्षकांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यानंतर ट्रम्प लगेच मीडिया रूममध्ये आले व बाहेर गोळीबार झाल्याची माहिती दिली. सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात एक जण जखमी झाला असून त्याला रुग्णालयात नेले आहे. संशयित शस्त्रसज्ज असल्याची माहिती आहे, ट्रम्प यांनी सांगितले. गोळीबारानंतर परिस्थिती नियंत्रणात आहे.

ट्रम्प म्हणाले – कोणाला तरी रुग्णालयात नेले आहे. त्याची स्थिती कशी आहे, ते मला माहीत नाही. सिक्रेट सर्व्हिसने तत्काळ उचललेल्या पावलांबद्दल ट्रम्प यांनी त्यांचे कौतुक केले. पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर काही मिनिटांत ट्रम्प यांना पत्रकार कक्षातून बाहेर नेण्यात आले. पत्रकार परिषदेमध्येच रोखण्याचे कारण त्यावेळी सांगण्यात आले नाही. नंतर ट्रम्प यांनी स्वत: गोळीबाराच्या घटनेची माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER