
मुंबई :- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना भारत आणि अमेरिकेमधील राजकीय संबंध अधिक सुदृढ करण्यासाठी अमेरिकेतील एक उच्च नागरी पुरस्कार ‘लीजन ऑफ मेरिट’ (Legion of Merit) देऊन सन्मानित केले आहे.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट सी. ओ. ब्रायन यांनी ही माहिती दिली. अमेरिकेतील भारतीय राजदूत तरनजित सिंह संधू यांनी मोदींच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारला.
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने रॉबर्ट सी. ओ. ब्रायन यांचा दाखला देत याबाबत ट्विट केले आहे. अमेरिका आणि भारतामधील राजकीय संबंध दृढ करण्यासाठी पुढाकार घेणारे भारतीय पंतप्रधान म्हणून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना लीजन ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मानित केले आहे. राजदूत तरनजित सिंह संधू यांनी पंतप्रधान मोदींच्यावतीने पदक स्वीकारले, अशी माहिती या ट्विटमध्ये देण्यात आली आहे.
We are holding an oversight hearing tomorrow to examine the irregularities in the 2020 election.
A large percentage of Americans simply don’t think this was a legitimate election. That’s an unsustainable state of affairs for our country. https://t.co/VBRudicwU1 pic.twitter.com/sMuyt0L9AK
— Senator Ron Johnson (@SenRonJohnson) December 15, 2020
२० जुलै १९४२ रोजी अमेरिकन काँग्रेसने लीजन ऑफ मेरिट मेडल देण्यास सुरुवात केली. हा पुरस्कार अमेरिकन लष्कर आणि परदेशातील लष्कराच्या सदस्यांना तसेच राजकीय व्यक्तींना प्रदान करण्यात येतो. असाधारण कामगिरी करणाऱ्यांना हा सन्मान दिला जातो. अमेरिकेकडून परदेशी नागरिकांना देण्यात येणाऱ्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी हा एक आहे.
हा पुरस्कार म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा आणि जागतिक स्तरावर भारत हा नवीन शक्ती म्हणून पुढे येत आहे या गोष्टीला मिळणाऱ्या पाठिंब्याचे प्रतीक आहे. तसेच हा पुरस्कार म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि अमेरिकेमधील राजकीय संबंध सुधारले असून जागतिक शांतता आणि समृद्धीला पाठिंबा देण्यासाठी दोन्ही देशांनी काम केल्याचं प्रतीक आहे, असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.
अमेरिकेतील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक असणारा लीजन ऑफ मेरिट पुरस्कार मिळवण्याआधी मोदींना २०१६ साली सौदी अरेबियाने ‘ऑर्डर ऑफ अब्दुल अजीज अल सऊद, अवॉर्ड ऑफ गाजी अमीर अमानुल्लाह खान’ (२०१६), फिलिस्तीन अवॉर्ड २०१८, संयुक्त अरब अमिरातीचा ‘ऑर्डर ऑफ जायद अवॉर्ड’ (२०१९), रशियाचा ‘ऑर्डर सेंट अॅड्र्यू’ (२०१९) असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
ट्रम्प यांनी जपान आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनाही लीजन ऑफ मेरिट या पुरस्काराने सन्मानित केले आहे. ओ ब्रायन यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनाही मेरिट ऑफ लीजन पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याची माहिती दिली. दोन्ही पुरस्कार त्या देशातील वॉशिंग्टन डीसीमधील राजदूतांनी स्वीकारले. आबे यांना स्वतंत्र आणि मुक्त इंडो-पॅसिफिक धोरणांसाठी हा पुरस्कार देण्यात आला तर मॉरिसन यांना जागतिक आव्हानांना तोंड देत सर्व देशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला