ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह : जगभरातल्या शेअर बाजारांत मोठी घसरण

trump

दिल्ली :- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि पत्नी मेलानिया हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या वृत्तानंतर जगभरातील शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली आहे.

आशियाई बाजारात जपानचा प्रमुख बेंचमार्क इंडेक्स ‘निक्केई’ १ टक्क्यापेक्षा जास्तने खाली आला. चीनचा प्रमुख बेंचमार्क इंडेक्स शांघाय आणि ऑस्ट्रेलियाचा एएसएक्स २०० इंडेक्स २ टक्क्यांहून अधिकने पडला. भारताच्या  शेअर बाजारला आज २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीची सुटी आहे. बाजार सोमवारी ५ ऑक्टोबरपासून सुरू होईल.

युरोपियन बाजारामध्येही घसरण अपेक्षित आहे. ट्रम्प यांच्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या वृत्तानंतर अमेरिकेच्या शेअर बाजाराचा अग्रणी इंडेक्स डाऊ जोन्स फ्यूचर ५०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला. ट्रेझरी बाँडवरील उत्पन्नही खाली आले.

तज्ज्ञांचा अंदाज आहे की, युरोपियन बाजाराची सुरुवातही लाल निशाणीवर असू शकते. ब्रिटनचा बेंचमार्क इंडेक्स एफटीएसई, फ्रान्सचा सीएसी आणि जर्मनीचा अग्रणी इंडेक्स डीएएक्स मोठ्या घसरणीसह उघडेल.

म्हणून घसरण

जगातील सर्वांत  मोठ्या अर्थव्यवस्थेत काहीही घडले तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होतो. अमेरिकेत येणाऱ्या दुसर्‍या मदत पॅकेजच्या आशेला धक्का बसला आहे. म्हणूनच जागतिक बाजारातील घसरण तीव्र झाली आहे.

गुरुवारी, बंद-बँक शेअर्सच्या शॉर्ट कव्हरिंगच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजार तेजीत उसळला होता. बँक निफ्टी जवळपास ६५० अंकांपर्यंत पोहचला. याचा फायदा गुरुवारी दोन्ही निर्देशांकांवर दिसला. व्यापार संपल्यानंतर सेन्सेक्स ६२९ अंकांनी वाढून ३८,६९७ वर बंद झाला. निफ्टी १६९ अंकांनी वधारून ११,४१७ वर बंद झाला. निफ्टी बँक ७९४ अंकांच्या वाढीसह २२,२४९ वर बंद झाला. मिडकॅप १४२ अंकांनी चढून १७,१२५ वर बंद झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER