महाविकास आघाडी सरकारच्या असहिष्णुतेचा खरा चेहरा जगासमोर: आशिष शेलार

Ashish Shelar-MVA

मुंबई :- रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. यापार्श्वभूमीवर भाजपा आमदार आशिष शेलारांनीही (Ashish Shelar) ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातल्या प्रेससाठी काळा दिवस असल्याचं आशिष शेलार म्हणाले आहेत. महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या असहिष्णुतेचा खरा चेहरा जगासमोर. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलणारे आता शांत आहेत, प्रेस, सामान्य माणूस आणि नागरिक त्रस्त आहेत, असंही टीकास्त्रही त्यांनी ठाकरे सरकारवर सोडले आहे.

एका प्रकरणात राज्य सरकारला उघडे पाडले म्हणून पत्रकार राहुल कुलकर्णीला अटक केली… सरकारविरोधात सोशल मिडियावर बोलणाऱ्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांसह सामान्य माणसाला ठेचून काढणे नित्याचेच झाले… आता सरकारला खडा सवाल विचारणाऱ्या संपादकाच्या हातात बेड्या… वा रे वा लोकशाही सरकार! काँग्रेसच्या सहवासात बिघडले ठाकरे सरकार.. हाच का तुमचा लोकशाही कारभार? दुर्दैवाने, लोकशाहीचा आजचा काळा दिवस… महाराष्ट्र आणिबाणीच्या दिशेने? अशा शब्दात आशिष शेलारांनी हल्लाबोल केला .

ही बातमी पण वाचा : रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER