खरा धोका या देशातील हिंदूंच्या आत्मघातकी वृत्तीचा : रणजित सावरकर

Ranjit Sawarkar

नागपूर : आपल्या देशाला खरा धोका पाकिस्तानमुळे नव्हे, तर खरा धोका या देशातील हिंदूंच्या आत्मघातकी वृत्तीचा आहे. याची जाणीव स्वातंत्र्यवीरांनी खूप आधीच करवून दिली आहे; त्याचे स्मरण करण्याचे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केले.

माझा आवाज दाबण्यासाठीच आनंद तेलतुंबडेविरुद्ध कारवाई : प्रकाश आंबेडकर

सप्तक व ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशनच्यावतीने हर्षधन प्रॉडक्शन निर्मिती, प्रसिद्ध साहित्यिक सुमन फडके लिखित व जागेश्वर ढोबळे दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर’ या ध्वनिचित्रफितीचे लोकार्पण विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात करण्यात आले. त्यावेळी, सावरकर बोलत होते. या प्रसंगी महापौर संदीप जोशी, स्मारक समितीचे अध्यक्ष अरुण जोशी, एलआयसीचे माजी महाव्यवस्थापक नीलेश साठे, सप्तकचे विलास मानेकर, ऑरेंज सिटीचे डॉ. चंद्रशेखर मेश्राम उपस्थित होते.

हिंदू म्हणून जोवर एकत्र येत नाही, तोवर त्याच षडयंत्राला आपण बळी पडणार आहोत. यासाठी जाती-पाती-पंथ विसरून सर्वांनी एकत्र या. आपण एक झालो की नाइलाजास्तव का होईना स्वार्थापोटी तरी काँग्रेसला हिंदुत्व स्वीकारावेच लागेल, असे रणजित सावरकर यावेळी म्हणाले.

सीएए हा विशिष्ट धर्मासाठी नाही तर ते लोक जाळपोळ करत आहेत, हिंदूंनाच बाहेरचे म्हटले जात आहे, हा देश आमचा म्हणत आहेत. मग, जर हा देश त्यांचा तर आम्हा बहुसंख्यकांसोबत भावांसारखेच राहा; अन्यथा आमच्या आक्रोशाचा सामना करा, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.

सावरकरविचार मेला तर हा देश संपेल, याचा विश्वास पाकिस्तानला आहे. त्याच षडयंत्राची अंमलबजावणी काँग्रेस करत असल्याचा आरोपही सावरकर यांनी यावेळी केला. प्रास्ताविक लघुपटाचे संगीत दिग्दर्शक अभिजित जोशी यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले.