शेतकरी आंदोलनाला ट्रक ऑपरेटर्सचा पाठिंबा, ८ डिसेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा

Farmers Protest

नवी दिल्ली : गेल्या सात दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आता ट्रक ऑपरेटर्सनेही पाठिंबा दर्शवला आहे. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने (All India Motor Transport Congress) शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून ८ डिसेंबरपासून संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, ट्रकचालकांच्या या भूमिकेमुळे देशात जीवनावश्यक वस्तूंसह या इतर वस्तूंची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

एआयएमटीसी (AIMTC) गुड्स व्हेईकल ऑपरेटर्सचे प्रतिनिधित्व करते. याअंतर्गत सुमारे दहा मिलियन म्हणजेच १ कोटी ट्रकर्स येतात. देशात सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यामध्ये यांचे मोठे योगदान असते. आता आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ८ डिसेंबरपासून संप पुकारण्याच येणार असल्याचा इशारा एआयएमटीसीने दिला आहे.

शेतकरी नेते स्वराज सिंह (Swaraj Singh) यांनी सांगितले की, आम्ही रस्त्यावर ठाण मांडून बसलेलो नाही. प्रशासनाने बॅरिकेट्स लावून आणि जवानांना तैनात करून आमची वाट रोखून धरली आहे. आम्ही या ठिकाणाला तात्पुरत्या तुरुंगाची उपमा दिली आहे. तसेच आम्हाला येथे अडवणे हे अटकेप्रमाणे असल्याचे आम्ही मानतो. आता आम्हाला ज्याक्षणी सोडले जाईल तेव्हा आम्ही दिल्लीच्या दिशेने मार्गक्रमण करू.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER