पुणे-सातारा महामार्गावर ट्रक पेटला

TRUCk

सातारा : पुणे-सातारा महामार्गावर सारोळा (ता.भोर) येथे एका चालत्या ट्रकने पेट घेतला. ट्रकचे इंजिन गरम झाल्याने ट्रकने पेट घेतला. यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. याविषयी अधिक माहिती अशी की, पुणे – सातारा महामार्गावरून (एमएच ०४ ईएल ८६४१) हा ट्रक कागदाची वाहतूक करत होता. यावेळी अचानक चालत्या ट्रकचे इंजिन गरम झाल्याने ट्रकने पेट घेतला. यामुळे सकाळी साडेसात वाजल्यापासूनच सातारा शहराच्या बाजूने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

या महामार्गावर शनिवारी- रविवारी अथवा इतर सुटीच्या दिवशी महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामामुळे वाहतूक कोंडीचा प्रकार नेहमीच पाहावयास मिळतो. सारोळा उड्डाण पुलाचे काम अर्धवट असल्यामुळे व साईडपट्टीची दुरवस्था असल्यामुळे सकाळी साडेसात वाजल्यापासून सातारा बाजूकडे वाहतूक कोंडी होती. त्यातच महामार्गावर ट्रकने पेट घेतल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. महामार्ग पोलीस सकाळपासून वाहतूक कोंडी सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करीत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER